0
पुणे, दि. 15, सप्टेंबर - मुळशीतील पौड-लोणावळा रस्त्यावर कोळवण गावाजवळ पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (14  सप्टेंबर) रात्री 8.15 वाजता घडली. मयत इसम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. पप्पू सातपूते (रा. अकोले, वय 25) असे मयताचे  नाव असून त्याच्या काकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पौड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आरोपींच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची तीन पथके रवाना  झाली आहे. सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्याच्या राहत्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याच्या गुंडगिरीच्या स्वभावामुळे त्याला पप्पू नावाने ओळखले  जाऊ लागले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे काही गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपर करण्यात आले होते. त्याची हत्या  झालेल्या कोळवन परिसरात त्याचे यापूर्वीही भांडण झाले होते. त्यामुळे त्याला मारण्यातही कोळवन परिसरातीलच काही युवकांचा हात असल्याची प्राथमिक माहिती  येत आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.

Post a Comment

 
Top