0
डबलीन, दि. 09, सप्टेंबर - श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदावरून नुकतेच पायऊतार झालेले ग्रॅहम फोर्ड यांची आयर्लंडच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयर्लंड क्रिकेट मंडळानेही आज या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयर्लंडचे सध्याचे प्रशिक्षक जॉन ब्रेसव्हेल यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपनार आहे. त्यानंतर फोर्ड प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षक देण्याचा फोर्ड यांना दांडगा अनुभव आहे. 1999 ते 2002 या काळात दक्षिण आफ्रिकेचे तर 2012 ते 2014 या काळात श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षकपद त्यांनी सांभाळले. त्यानंतर 2016मध्ये त्यांना पुन्हा एकदा श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले, परंतु सध्या श्रीलंका क्रिकेटची झालेली पडझड पाहता नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी जून महिन्यात पदाचा राजीनामा दिला.

Post a Comment

 
Top