Breaking News

कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा - पाचपुते

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - राज्य सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना सर्वात मोठी कर्ज माफी दिली. याद्वारे शेतकर्‍यांना मोठा दिलासा व आधार मिळाला. याद्वारे  भरण्यात येणार्‍या अर्जाची मुदत येत्या दि. 15 रोजी संपत आहे. काही तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे  कर्जमाफीच्या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात पाचपुते यांनी  राज्यमंत्रीमंडळातील चार मंत्र्यांना निवेदन दिले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख व कृषी मंत्री पांडुरंग  फुंडकर यांचा समावेश आहे. या निवेदनात पाचपुते यांनी म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने  शेतकर्‍यांकडून अर्ज भरले जात आहेत. या ऑनलाईन प्रक्रियेत शेतकर्‍यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.