0
नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - सिरसामध्ये गुरमीत राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात शनिवारी झालेल्या शोध मोहिमेच स्फोटके जप्त करण्यात आले  आहेत. हरियाणा सरकारचे जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मिश्रा यांनी सांगितले की, डेरा मुख्यालयाच्या परिसरात एक अवैध फटाक्यांचा कारखाना चालवला  जात असल्याचे समोर आले आहे. हा कारखाना सील करण्यात आला आहे. येथे मानवी सापळे सापडल्याप्रकरणी ते म्हणाले की, याबाबत सध्या सांगता येणार नाही.  यासाठीच्या तपासासाठी तज्ज्ञांचे पथक बोलवण्यात आले आहे.
यापूर्वी झालेल्या तपासणीत पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना रोख रक्कम, हार्ड डिस्क व प्लॅस्टिकचे चलनदेखील आढळले आहे. मुख्यालयातील दोन  खोल्या सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय आलिशान गाडी, सात हजाराच्या जुन्या नोटा, लेबल नसलेली औषधे, ओबी व्हॅन आदी वस्तू सापडल्या आहेत.

Post a Comment

 
Top