0
सोल (कोरिया), दि. 16, सप्टेंबर - भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम  फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं चीनच्या बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला.
सिंधूनं पहिल्या गेममध्ये शानदार सुरुवात केली आणि 9-1 अशी बढत घेतली. पण नंतर काही चुका झाल्या पण तिची लय बिघडली नाही. त्यामुळे पहिल्या गेममध्ये  सिंधूनं बिंगजियाओवर 21-10 असा विजय मिळवला. पण दुसर्‍या गेममध्ये बिंगजियाओनं झोकात पुनरागमन करत सिंधूला जोरदार टक्कर दिली. पण सिंधूनं दुसरा  गेम 17-21नं गमावला. मात्र, सामन्यातील तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधू चुका सुधारत बिंगजियाओवर 21-16 अशी मात करत सामनाही जिंकला. अंतिम  सामन्यात सिंधू जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे पीव्ही सिंधू कोरिया सुपर सीरीज आपल्या खिशात घालणार का? याकडे सर्वांचं लक्ष  असेल.

Post a Comment

 
Top