Breaking News

वन जमिनीवरील अतिक्रमण न काढल्यास वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील जामोद केपारमेंट 453 मधील अतिक्रमण हटविण्याची मागणी जामोद येथील सेवाराम भुतडा यांनी  केली आहे. ही जमीन वन परिक्षेत्राची असून ती सेतुबाई भिलाला व रणछोडदस भिकुसिंग भिलाल रा.चालठाणा यांनी अतिक्रमण केले आहे. 
यापूर्वी सदर प्रकरणाची तक्रार केली असून त्यानुसार बुलडाणा येथील वन विभागाचे सव्हेअर येऊन सदर जमिनीचे मोजमाप करून सदर जमीन ही वन खात्याची  असल्याचा अहवालसुद्धा दिलेला आहे. त्यावरून बुलडाणा येथील डी.एफ.ओ यांनी जळगाव जामोद वनक्षेत्रात अधिकारी कांबळे यांना सदर अतिक्रमण काढून सदर  जमीन वनखात्याच्या ताब्यात द्यावी, असे आदेश दिलेले आहे. परंतु कांबळे हे राजकीय पुढार्‍यांच्या सांगण्यावरून वेळकाढूपणा करीत आहेत. व वरिष्ठांच्या आदेशाला  केराची टोपली दाखवत आहे. तर याबाबत जामोद वनपाल यांना विचारणा केली असता आम्ही सदर अतिक्रमण काढण्यासाठी जळगाव जा. पोलिस स्टेशनला पोलिस  बंदोबस्त मागितला असून तो न मिळाल्यामुळे सदर अतिक्रमण काढण्यात अडचण येत आहे. तर तक्रारदार यांनी म्हटले की, त्यांनी फक्त 4 पोलिस व 2 महिला  कर्मचारी इतकाच बंदोबस्त आणला आहे. राजकीय दबावपोटी व लाचखाऊ वृत्तीमुळे सदर अतिक्रमण काढत नसल्याचे दिसून येते. सदर अतिक्रमण न काढल्यास  मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, असा इशारा देण्यात आला आहे.