Breaking News

युवक काँगे्रसच्या दणक्याने अखेर शेतकर्‍यांना पुरविली तांत्रिक माहिती

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रीया सदया सुरू आहे. मात्र  बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे बँक कर्जधारकाचे या अर्जात नमुद करण्यासाठी आवश्यक असलेली खाते क्रमांक, आयएफसी कोड या कर्जधारक शेतकर्‍यांकडे खाते  पुस्तीका नसल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज भरतांना यासंदर्भातील माहिती देता येत नव्हती. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी बँकेकडे चकरा मारून याची वारंवार  मागणी केल्यानंतरही बँकेकडून टाळाटाळ केल्या जात होती. ही बाब युवक कॉगे्रसच्या लक्षात येताच युवक कॉगे्रसचे तालुका अध्यक्ष रमेश सुरडकर व इतरांनी  शेतकर्‍यासह बुलडाणा जिल्हा के्रद्रीय सहकारी बँकेचे चिखली शाखा कार्यालय गाठुन बँक व्यवस्थापक यांचेकडे शेतकर्‍यांची मागणी रेटून धरली. कर्जमाफी साठी  ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया त्यात आवश्यक त्या माहितीचा शेतकर्‍याकडे अभाव, माहितीसाठी बँक अधिकार्‍यांकडून केली जाणारी टाळाटाळ यावरून  शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेता, तातडीने त्यांना खाते पुस्तीका देण्याचे मागणी रेटली. त्यावर शेतकर्‍यांना ताबडतोब आवश्यक ती माहिती देण्याचे आदेश  व्यवस्थापक पडघान यांनी संबंधीतांना देवून कार्यवाही सुरू केली.
युवक कॉगे्रसच्या या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हा केंद्रीय चिखली बँकेतील सर्व शेतकर्‍यांना त्यांची आवश्यक माहिती पुरविण्यास सुरूवात झाल्याने ते शेतकरी आता  आपला कर्जमाफीचा अर्ज ऑनलाईन भरू शकतील. यावेळी तालुका युवक कॉगे्रसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, संजय गिरी, सरपंच लिबांजी सवडे, बंडु कदम, संजय  सोळंके, ज्ञानेश्‍वर सोळंके, राजु सावंत, पिंटू पाटील, भारत मोरे, भास्कर काकडे, तात्याराव सोळंकी, सिध्देश्‍वर सोळंकी, वंसंता इंगळे, विष्णु मोरे, किशोर साळवे,  बाळु साळोख, महादु भालेराव, किशोर जाधव, दत्ता परीहार, विजु पवार, दिपक पायघन, आनंथा गिरी, सुधाकर सवडे, यांची उपस्थिती होती.