Breaking News

अनिताच्या आत्महत्येबाबतच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षेविरोधात आवाज उठवलेल्या एस. अनिताच्या आत्महत्येबाबतच्या  याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जी.एस. मणि या विधिज्ञाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन  तपासाची मागणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या प्रकरणाचा तपास केला जावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.  राज्यात कायदा व सुव्यवस्था राखून न्यायालयाच्या निर्णयाचा कोणी अनादर करू नये यासाठी काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात यावेत असेही  याचिकेत म्हटले होते. तामिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील विद्यार्थीनी अनिताने नीट परिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. काही दिवसांपुर्वी तिने  आत्महत्या केली होती.