Breaking News

नगरसेविकेच्या पतीने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन


जालना,दि.17  : मराठवाडयात नगरसेविकांच्या पतींच्या नगरपालिकेतील वाढत्या कारभारामुळे नागरिक आणि कर्मचारी वैतागले असून आज नगरसेविकेच्या पतीने कर्मचार्‍याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ अंबड नगर पलिकेच्या कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन केले तर माजलगावला नगपालिकेच्या बैठकीला नगरसेविकेऐवजी पतीच येत असल्याने सौरदमल या कार्यकर्तीने त्या ठिकाणी जावून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत सक्रीय व्हावे म्हणून आरक्षण देण्यात आले मात्र या जागी अनेक माजी नगरसेकांनी आपल्या पत्नी किंवा आईला नगरसेविका म्हणून निवडून आणून स्वताचा कारभार महापालिकेत चालु ठेवला एवढेच नव्हे तर ते अधिकारवाणीने महापालिकेच्या कर्मचार्यांना राबवू लागले. अंबड येथेहि नगरसेविकांचे पतीच कारभार करत असून आज नगरपालिकेत येवून त्यांनी कर्मचार्यांना शिवीगाळ केली या मुळं वैतागलेल्या कर्मचार्यांनी आज लेखणीबंद अंदोलन केले. तर माजलगावला नगपालिकेच्या बैठकीलाहि नगरसेविके ऐवजी पतीच येत असल्याने सौरदमल या सामाजिक कार्यकर्तीने त्या ठिकाणी जावून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.