0
नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम याची मानसकन्या हनीप्रित हिची हत्या होण्याची शक्यता आहे, असा इशारा गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे . राम रहिम याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हनीप्रित फरार झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले. मात्र तिच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.
हरियाणा पोलिसांनी हनीप्रितविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. राम रहिम याला शिक्षा सुनावल्यानंतर पळून जाण्यास मदत करण्याचा कट रचल्याचा आरोप हनीप्रितवर करण्यात आला आहे. हनीप्रित ही राम रहिम याच्या मदतीसाठी पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून आणणार होती, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

 
Top