Breaking News

प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक निलंबीत; शाळेसमोर पालकांची जोरदार निदर्शने

गुरुग्राम, दि. 10, सप्टेंबर - रेयान इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेविरोधात पालकांचा तीव्र संताप पाहता शाळेच्या मुख्याध्यापकांचे  निलंबन करण्यात आले. मात्र शाळेविरोधात कडक कारवाई केली जावी या मागणीसाठी संतप्त पालकांनी निदर्शने सुरु ठेवली आहेत. प्रद्युम्नच्या कुटुंबियांनी पोलीस  तपासावर प्रश्‍न उपस्थित करत सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग ) चौकशीची मागणी केली आहे.
या हत्येमागील खरा गुन्हेगार वेगळा आहे. आरोपीला वाचवण्यासाठी बस वाहकाला पुढे केले जात आहे. प्रद्युम्नने शाळेशी सबंधीत काही चुकीच्या गोष्टी पाहिल्या  असतील त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली, असे प्रद्युम्नची आई ज्योती ठाकूर यांनी सांगितले. प्रद्युम्न हा बसने जात नव्हता तर बसचा वाहक त्याची हत्या का  करेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये दुसरीत शिकणार्‍या सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची शुक्रवारी सकाळी गळा चिरुन  हत्या करण्यात आली.