Breaking News

कर्जमाफीचे अर्ज भरताना अनंत अडचणी

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा अंमलात आणण्यासाठी कर्ज भरण्यालासाठी पात्र असलेल्या शेतकरी  बांधवांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केलेले आहे. त्याला अजूनही हवा तसा वेग आलेला नाही. हा अर्ज जपश्रळपश भरणे गरजेचे असल्याने  शेतकरी धड़पड़ करीत आहेत. पण अर्ज भरण्यासाठी असलेल्या शासकीय यंत्रणेमध्येच अनंत अडथळे येत आहेत. या यंत्रणेमध्ये अडथळे सर्व्हर जांब होणे, आधार  कार्डची पड़ताळणी न होणे,  शेतकरी पती-पत्नी व खातेदार यांच्या अंगठ्याचे ेपश्रळपश  ठसे न येणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी वैतागला आहे. कधी कधी  राञीदेखील वृद्धपकाळाने थकलेल्या मजूरांची यामुळे फारच धडपड होते. शासनाने ठरवून दिलेली डेटलाईन जवळ येवून ठेपली आहे. कर्जमाफीचा अर्ज भरेल की  नाही, याची चिंता शेतकरी वर्गात पसरली आहे. अशा विविध अड़थळ्यामुळे शेतकरी कर्ज माफीचा अर्ज भरण्यापासून वंचित राहतो की काय असा प्रश्‍न या भागात  उपस्थित होत आहे.
या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासनाने कर्ज माफीचे फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी मुळा धरणाच्या टेलच्या भागातील शेतकरी  बचाव जन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष एकनाथ काळे, बाळासाहेब काळे, शंकर नारळकर, अशोक दुकळे, राजेन्द्र आढावा, अण्णासाहेब दुकळे, भाऊसाहेब सामृत,  बाळासाहेब जाधव, ड़ॉ. बेडके, ड़ॉ. संदिप नजन, माऊली खरड, संतोष मेरड, रविंद्र देशमुख, राजेन्द्र फटांगरे, दत्तू अण्णा पवार, लक्ष्मण पवार,  शहाराम आगळे,  विठ्ठल फटांगरे, श्रीरंग माने, मधुकर पालवे आदींनी केली.