Breaking News

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या भाववाढीचा निषेध

पुणे, दि. 15, सप्टेंबर - पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या भाव वाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ च्या पर्वती विधानसभा मतदार संघातर्फे  सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलन करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, बंडू नलावडे, द.  स. पोळेकर, अनुसया गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.दरवाढ करून जनतेची लूट सुरू आहे. जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आल्याचे केंद्रीय  अर्थमंत्री अरुण जेटली सांगत आहेत. असे असेल तर सामान्य व्यक्तीला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर कमी झाले असताना देखील सर्वसामान्यांवर  दरवाढीचा बोजा का’, असा प्रश्‍न छाजेड यांनी उपस्थित केला आहे.
हे सरकार विश्‍वासघातकी असून, लोकांना दिलेला एक ही शब्द त्यांना पाळला नाही. सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले असून, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ  करून जनतेवरील बोजा वाढवला आहे. महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून, ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा सर्वच विधानसभा मतदार संघात  सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा बागवे यांनी दिला आहे.