0
पुणे, दि. 13, ऑक्टोबर - मार्केटयार्ड येथील प्रेमनगर परिसरात लागलेल्या आगीत एक दुकान आणि दोन घरे जळून खाक झाली. या आगीमध्ये एका सिलेंडरचा स्फोट झाला तर  एक पेटलेला सिलेंडर बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना गुरुवारी (दि.13) मध्यरात्री दिडच्या सुमारास घडली. या आगीत ग ॅरेज, स्पेअर पार्टसचे दुकान आणि दुमजली घर जळून खाक झाले. तसेच गॅरेजच्या बाहेर उभी असलेली एक दुचाकी आणि स्पेअर पार्टसच्या दुकानातील ऑईलचे कॅन  जळाले.आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे 3 बंब आणि 1 टँकर दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.  सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Post a Comment

 
Top