Breaking News

कीटकनाशक फवारणी; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख भरपाई द्या - आ. कडू

मुंबई, दि. 04, ऑक्टोबर - यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना 10 लाख रु. एवढी भरपाई देण्यात  यावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे . या दुर्घटनेतील पीडितांना राज्य सरकारने 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आ. कडू म्हणाले की , मुंबईत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याच्या दुर्घटनेची ज्या प्रमाणे तातडीने दखल घेण्यात आली त्या प्रमाणेच  शेतकर्‍यांच्या मृत्यूचीही दखल घेतली जावी . या शेतकर्‍यांच्या मृत्यूमुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे त्यांना 10 लाख रु . एवढी भरपाई दिली  जावी असे आ. कडू यांनी सांगितले .
दरम्यान मुंबईत रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख तर कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या  नातेवाईकांना 2 लाख रु . हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे , अशी टीका शेतकरी आंदोलन सुकाणू समितीने केली आहे .