Breaking News

ऊस उत्पादक शेतक-यांनी प्रति एकरी 100 टन उत्पादन घ्यावे - माजी कृषीमंत्री थोरात

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर -  संगमनेर साखर कारखाना सह अमृत उद्योग समूहात सर्वजण मनापासून काम करतात.त्यामुळे रायात येथील सहकाराचा मौठा  लौकिक आहे.नवीन कारखान्यामुळे तालुक्याच्या विकासात नवीन पर्व सुरु झाले आहे.सरासरी उत्पादकता वाढविल्यास सर्वोत्तम भाव मिळणार असून ऊस  उत्पादकांनी एकरी 100 टन उत्पादन घ्यावे,असे आवाहन माजी महसूल व कृषीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2017 - 2018 या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव कानवडे होते.बाजीराव खेनमर पाटील, कांचन थोरात,रणजीतसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात,भाऊसाहेब  कुटे,लक्ष्मणराव कुटे,बाबा ओहोळ,अजय फटांगरे,निशा कोकणे,प्रविण गोयीखेडकर,गिरीष कराळे, अतुल गोयीखेडकर,चंद्रकांत कडलग,हरिभाऊ वर्पे,पांडूरंग  कोकणे,संपतराव डोंगरे,आर.बी. रहाणे,प्रकाश कलंत्री,राजेंद्र गुंजाळ,प्रदीप मालपाणी,साहेबराव गडाख,सिताराम राऊत, विश्‍वासराव मुर्तडक,कार्यकारी संचालक जगन्नाथ  घुगरकर आदि उपस्थित होते.यावेळी आ.थोरात यांच्या हस्ते एकरी उच्चांकी ऊस उत्पादन घेणार्या ऊस उत्पादक शेतक-यांचा पुरस्काराची रोख रक्कम व सन्मान  चिन्ह देवून गौरव करण्यात आला.वेळी बोलतांना आ.थोरात म्हणाले की,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी संस्था मुलांप्रमाणे जपल्या.हीच परंपरा आपण  पुढे सुरु ठेवली आहे.कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था सर्वोत्तम काम करत आहे.5500 मेट्रीक टन क्षमतेचा नवीन कारखाना 14 लाख मेट्रीक टन  ऊसाचे गाळप करु शकतो.सोबत वीज निर्मिती प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पादनात वाढ होईल.यासाठी ऊस उत्पादकता वाढली पाहिजे.शेतक-यांनी एकरी किमान  100 टन मेट्रीक टनाचे उदिष्ट ठेवून काम करावे. आधुनिक पध्दतीचा वापर करा.चांगली उत्पादकता,चांगली रिकव्हरी व चांगला भाव मिळून देईल.कारखान्याच्या  हंगामात अनेक चाके फिरत असतात.सर्व हंगाम निर्विघ्न पार पाडण्यासाठी ईश्‍वराचे आशिर्वाद ही महत्वाचे असतात.यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने ऊस  लागवड वाढवावी. कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी बांधवांचा आपल्या कारखान्यावर मोठा विश्‍वास आहे.तो यापुढे ही कायम जपला जाईल.शेतकरी व कामागारांच्या जिवनात  आनंद निर्माण करण्याचे काम या कारखान्याने सातत्याने केले आहे.राष्ट्रीय पातळीवरचा साखर निर्यातीचा पुरस्कार मिळाला हे कौतूकास्पद असून कर्मचा-यांसाठी 20  टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून राजहंस दुध संघाचे रिबेट,अनामत, बोनस यांसह अमृत उद्योग समूहातून सुमारे 100 कोटी रुपये  दिवाळी निमित्त बाजारात येणार असून सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.कानवडे म्हणाले कि,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या प्रगतीची नेत्रदिपक वाटचाल सुरु आहे. या कारखान्याने  शेतकरी,कामगार,ऊस उत्पादक व इतर घटकांच्या जिवनात समृध्दी आणली आहे. नवीन कारखान्याचा मागील ट्रायल सीझन चांगला झाला आहे. यावेळी सर्वत्र  पाऊस चांगला आहे.चांगल्या सिझनसाठी अनुकुलता आहे.नवीन कारखान्यामुळे साखर शुभ्र दाणेदार व अधिक गुणवत्तेची मिळणार आहे.आमदार बाळासाहेब थोरात  यांच्या दुरदृष्टी नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.थोरात कारखान्याला साखर फेडरेशन कडून 70 कोटीचे कर्ज,पर्यावरणाची नाहारकत व विज मंडळाशी करार  झाल्यानंतर सर्व योजना बंद झाल्या आहेत.परमेश्‍वरी आशिर्वाद ही लाभले आहेत.कारखान्याने सभासदांसाठी अपघाती विमा दोन लाख रुपये केला आहे.10 ते 12  ऑक्टोबर काळात मोफत साखर वाटप होणार असून 8 ऑक्टोबरपर्यंत 100 रुपये पेमेंट प्रमाणे बँकेत वर्ग होणार असल्याचे ही ते म्हणाले.साखर कारखान्याचे  कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर प्रास्ताविक करतांना म्हणाले की, कारखान्याने कामगारांसाठी 15 टक्के पगारवाढ करुन मेडीक्लेम पॉलिसी मयत निधी सुरु केली  आहे. कारखान्याने कायम सभासद,ऊस उत्पादक व कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घेतले असून हा हंगाम यशस्वी होईल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी  येष्ठ सभासद रामकृष्ण काकड,शिवाजी तांबे,लालाभाई शेख,बाळकृष्ण दातीर,तुकाराम घुगे,बाबुराव शिंदे,बाळासाहेब देशमुख, विश्‍वनाथ घोलप,नामदेव साबळे,आनंदराव  गुंजाळ,गुलाब भरीतकर यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदिपन तसेच चंद्रकांत कडलग,वैशाली कडलग,गणपत सांगळे,मंदा सांगळे, रोहिदास पवार,मनिषा पवार,संतोष  हासे,मनिषा हासे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.यावेळी पांडूरंग घुले,शांताबाई खैरे,मिरा शेटे,सुनंदा जोर्वेकर,निर्मला गुंजाळ,अर्चना बालोडे,केशवराव  मुर्तडक,सिताराम वर्पे,संपतराव गोडगे, बाळकृष्ण दातीर,बाळासाहेब पवार,बापूसाहेब गिरी,बाळासाहेब शिंदे,मिनानाथ वर्पे,किरण कानवडे आदि उपस्थित होते.नामदेव  कहांडळ यांनी सुत्रसंचालन केले.कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.