Breaking News

‘महिंद्रा’च्या ‘केयूव्ही 100’चे मंगळवारी होणार लाँचिंग

मुंबई, दि. 09, ऑक्टोबर - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी गाडी ‘केयूव्ही100’चा लाँचिंग सोहळा मंगळवारी मुंबईत होणार आहे. आताच्या तरूण पीढीला  आकर्षित करण्याच्या उद्देशाने या गाडीचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ‘महिंद्रा’ने गेल्या काही वर्षात लाँच केलेल्या विविध गाड्यांमध्ये ‘स्पोर्ट्स युटीलीटी  व्हेइकल’ म्हणजेच ’एसयूव्ही’ गाड्यांचा भरणा अधिक होता. याच धर्तीवर ‘महिंद्रा’तर्फे ‘केयूव्ही100’ ही गाडीदेखील लाँच करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11  वाजता विले पार्ले येथील हॉटेल सहारा स्टार येथे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका आणि ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख राजन वधेरा यांच्या  उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.