0
नागपूर, दि. 11, ऑक्टोबर - लीपिक न्याय विभागाअंतर्गत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्र तिष्ठानतर्फे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना राजेश मेश्रामला
डॉ.आंबेडकर समता खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात मोना मेश्राम हिला गौरविण्यात आले. 11 लाख रुपयाचा धनादेश, मानचिन्ह, असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजातील दुर्बल घटकासाठी कार्य करणारा सार्वजनिक उपक्रम म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची  स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिनाला समता प्रतिष्ठानची सुरुवात झाली आहे.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कुमारी मोना राजेश मेश्राम यांचे प्र तिष्ठानच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रादे शिक आयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड,कास्ट्राईबचे प्रमुख कृष्णा इंगळे, सहायक आयुक्त विजय वाकुलकर तसेच दलित मित्र, समाजभूषण  पुरस्कार प्राप्त व्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top