Breaking News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 11 नोव्हेंबरला ’चलो केरळ’

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - ’सेव्ह डेमोक्रॅसी-सेव्ह केरला’ हा नारा देण्यासाठी तिरूअनंतपूरम येथे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी  परिषदेतर्फे 11 नोव्हेंबर रोजी मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून दोनशे कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती स्वप्नील बेगडे यांनी  पत्रकार परिषदेत दिली. सभेस भारतातून तीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. केरळमध्ये कम्युनिस्ट सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप कार्यकर्त्यांच्या हत्येला  जबाबदार असल्याने त्या सरकारच्या विरोधात हा यल्गार करणार आहेत. 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या हत्या केरळमध्ये करण्यात आल्या आहेत. याच्या निषेधार्थ या निषेध सभेचे  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेगडे यांनी यावेळी दिली. यावेळी समर्थ बंडे, प्रियंका पाटील, यतिराज होनमाने, विकास वाघमारे उपस्थित होते.