Breaking News

फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये मोबाईल,  इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.
टीव्ही आणि अ‍ॅप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट आणि एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. फोन पेवरुन पेमेंट केल्यास 20 टक्के कॅशबॅक (200  रुपयांपर्यंत) मिळेल. काही स्मार्टफोनवर भरघोस सूट असेल. तर बजाज फिनसर्व्हसोबत मिळून फ्लिपकार्ट 4 लाख फोनवर नो कॉस्ट ईएमआय देणार आहे.