Breaking News

चाळीसगाव तालुक्यातील 14 पैकी 9 ग्रामपंचायतीवर भाजप

जळगाव, दि, 12, ऑक्टोबर - चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकानंतर पुन्हा एकदा  भाजपाचा वरचष्मा कायम राहिला असून चाळीसगाव तालुक्यातील 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
निवडून आलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांनी आमदार उन्मेश पाटील यांची कार्यालयात भेट घेऊन गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार उन्मेश पाटील,  भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे व तालुका पदाधिकार्‍यांनी निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे पेढे भरवून अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.