Breaking News

मुंबई महापालिकेतील कर्मचा-यांना 14,500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - मुंबई महापालिकेतील कर्मचा-यांना यंदा दिवाळीनिमित्त 14 हजार 500 रुपयांचा सानुग्रह अनुदान आज जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा  500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बरोबरच महापालिकेच्या अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षकांना 7 हजार 51 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे, अशी घोषणा महापौर  विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी येथे केली.
याचा 1 लाख 10 हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. यासाठी महापालिकेचे 160 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या वर्षी वेतनाच्या सरासरी 20 टक्के म्हणजे 40 हजार  रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी कामगार संघटना आग्रही होत्या. या अनुषंगाने 5 ऑक्टोबर रोजी मोर्चाही काढण्यात आला होता. या कालावधीत कामगार संघटना, महापौर व महापा लिका आयुक्त यांच्यात बैठका सुरू होत्या.