Breaking News

दिवा रेल्वे स्थानक : 150 दुकान गाळे जमीनदोस्त, 200 हातगाड्यांवर कारवाई

ठाणे, दि, 12, ऑक्टोबर -  गेल्या 5 ते 6 वर्षांपासून दिवा स्टेशन ते दातिवली चौक या रस्त्याच्या रूंदीकरणाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल  यांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आलेल्या धडक कारवाईत 150 गाळे जमीनदोस्त करण्यात आले तर 200 हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या. दरम्यान सदरच्या कारवाईनंतर रस्ता रू ंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
आज दुपारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. दिवा स्टेशन(पूर्व) परिसरात अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रूंदीक रणाचे काम रखडले होते. त्याचबरोबर तेथील तलावाभोवतीही अनधिकृत बांधकामाचा आणि हातगाड्यांचा विळखा पडला होता. आज या धडक कारवाईमुळे दिवा स्टेशन परिसर ते दा तिवली चौक परिसर पुर्णत: मोकळा झाला.
या कारवाईमध्ये तेथील दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामेही तोडून टाकण्यात आली. दरम्यान उद्या दुस-या दिवशीही दिवा स्टेशन ते साबे गाव रस्ता रूंदीकरणाची कारवाई सुरू राहणार  आहे.
दरम्यान सदरची कारवाई झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्याने नगर अभियंता अनिल पाटील यांनी रस्त्याचे काम सुरू के ले.
सदरची कारवाई उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनीश जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, श्री. गोसावी, शैलश भेंडाळे, कार्यालयीन अधीक्षक सुनील मोरे  यांनी पोलिस बंदोबस्तात पार पाडली.