Breaking News

दिव्यात दुस-या दिवशीही कारवाईचा धडाका; 156 बांधकामांवर बुलडोझर-दिवा तलाव अतिक्रमणमुक्त

ठाणे, दि. 13, ऑक्टोबर - दिवा ते दातिवली चौक या रस्त्यांच्या रूंदीकरणामध्ये अडथळा ठरणा-या बांधकामाविरूद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या आजच्या दुस-या दिवशी  जवळपास 156 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. आज केलेल्या या कारवाईमुळे दिवा तलाव अतिक्रमणमुक्त झाला आहे.
दिवा स्थानक (पूर्व) ते दातिवली चौकपासून पुढे साबे गाव पर्यंत रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी काल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत जोरदार कारवाई क रण्यात आली होती. या कारवाईमध्ये जवळपास 150 दुकानगाळे जमीनदोस्त करण्यात आले होते तर 200 हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या होत्या. आज दुस-या दिवशीच्या क ारवाईमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाने जवळपास 156 बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईमुळे दिवा तलावाभोवती अतिक्रमणाचा पडलेला विळखा कायमचा नष्ट झाला आहे.  सदरची कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले आणि कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांनी केली.