Breaking News

रस्त्यापासून 15 मिटर अंतरावर असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी उपोषण

बुलडाणा, दि. 12, सप्टेंबर - येथील बस स्थानकासमोरील के.ए.जैस्वाल यांचे दारुचे दुकान परवाना क्र.11194 हे अनधिकृतपणे चालू करण्यात आले असून या बाबत परिसरातील नाग रिकांनी 9 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन अर्ज देवून सदर दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. सदर निवेदनावर संबंधितांनी कोणतीही कार्यवाही केली  नसल्याने डीपी रोडवर नागरिकांनी दि.11 ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. 
सदर दुकान हे डी.पी.प्लॅनिंग मधील 15 मिटर रोडवरील जागेवर सुरु करण्यात आले, परंतु ही जागा नगर परिषद हद्दीत नसून त्या जागेचे खोटे दस्तावेज देवून उत्पादन शुल्क अधिकारी व  न.प.मुख्याधिकारी यांनी आर्थिक अपहार केला असून जैस्वाल यांना मदत केली आहे. सदर दुकानामुळे खेड्यापाड्यातून येणार्‍या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  हे ठिकाण अतिशय वर्दळीचे असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसुद्धा आहे. म्हणून सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी उद्धव झोरे, वैशाली ठाकरे, ए.डी.आव्हाळे,  व्ही.के.चव्हाण, सरिता भागवत, शिला मिसाळ, रा.रा.बोचाटे, गजानन गाडे, शिला निकस, अनिता मोरे, एस.आर.सपकाळ आदींनी निवेदन देवून उपोषण सुरु केले आहे.