Breaking News

फिफा अंडर-17 विश्‍वचषकातून भारत पहिल्याच फेरीत बाहेर

नवी दिल्ली, दि. 13, ऑक्टोबर - फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं आव्हान संपुष्टात आले असून; शेवटच्या लीग सामान्यात भारताला घानाकडून 4-0 ने पराभव स्वीकारावा लागला.
मॅचमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली. अमरजित सिंगच्या टीमला या मॅचमध्ये एकही गोल झळकावता आला नाही. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताला लीग मॅचेसमध्ये गाशा गुंडाळावा लागला मात्र आपल्या खेळाने भारतीय फुटबॉलपटूंनी फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. पहिला-वहिला वर्ल्ड कप खेळणार्‍या या टीमने-यांचच लक्ष वेधून घेतलं.