0
मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - क्रिकेटच्या प्रेमात आकंठ बुडालेला आपला भारत आज फुटबॉलक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. निमित्त आहे सतरा वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्‍वचषकाचं. 24 देशांचा सहभाग असलेल्या या विश्‍वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. भारतातली क्रिकेटची लोकप्रियता भविष्यात फुटबॉलला मिळणार का, या प्रश्‍नाचं उत्तर कदाचित हा विश्‍वचषक देणार आहे.
जगभरातून आलेल्या युवा फुटबॉलवीरांकडून पुढचे तीन आठवडे सार्‍या भारतवासियांचं आता हेच मागणं राहील, की करके दिखला दे गोल या मागणीचं निमित्त आहे  ते भारतात आयोजित अंडर सेव्हन्टीन फिफा विश्‍वचषकाचं. सतरा वर्षांखालील वयोगटासाठीच्या फिफा विश्‍वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी  उरला आहे.
कोलंबिया विरुद्ध घाना या नवी दिल्लीतल्या आणि न्यूझीलंड विरुद्ध टर्की या नवी मुंबईतल्या सामन्यानं अंडर सेव्हन्टीन विश्‍वचषकाची नांदी गायली जाईल आणि  त्यानंतर पुढचे 21 दिवस नवी दिल्ली आणि नवी मुंबईसह गोवा, कोची, कोलकाता आणि गुवाहाटीतही अंडर सेव्हन्टिन फिफा विश्‍वचषक सामन्यांचा खेळ रंगेल.

Post a Comment

 
Top