0
नवी दिल्ली, दि. 07, ऑक्टोबर - भारताला अंडर-17 फिफा विश्‍वचषकातल्या पदार्पणात अमेरिकेकडून तीन गोल्सच्या फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताच्या दृष्टीनं नामुष्कीची बाब म्हणजे या सामन्यात भारताला एकही गोल झळकावता आला नाही.
अमेरिकेचा कर्णधार जोस सार्जंटनं तिसाव्या मिनिटाला अमेरिकेचं खातं उघडलं. मग डर्किननं 51व्या मिनिटाला दुसरा, तर कार्लटननं 84व्या मिनिटाला तिसरा गोल डागून अमेरिकेला 3-0 असा मोठा विजय मिळवून दिला. या विश्‍वचषकातल्या ‘अ’ गटात भारत आणि अमेरिकेसह कोलंबिया आणि घाना संघांचा समावेश आहे. त्यामुळं विश्‍वचषकाच्या बाद फेरीत धडक मारायची, तर भारताला कोलंबिया आणि घानाला हरवण्याचा पराक्रम गाजवावा लागेल.

Post a Comment

 
Top