Breaking News

सातबारा उता-यासाठी 18 हजाराची लाच

पुणेे, दि. 06, ऑक्टोबर - शेतजमिनीची नोंद सातबा-यावर करून उतारा देण्यासाठी शेतक-याकडून 18 हजाराची लाच स्वीकारणा-या तलाठ्याला लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाच्या रंगेहात पकडले. ही कारवाई शिक्रापुर येथील हॉटेल अजिंक्यतारा येथे गुरुवारी करण्यात आली. ब्रम्हानंद संगप्पा टाचले (वय- 31, तलाठी  सजा निमोणे, ता शिरूर जिल्हा पुणे, रा. फ्लॅट नंबर 24, साईदर्शन बिल्डिंग, बाबुरावनगर, शिरूर तालुका, पुणे) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.याप्रकरणी  एका 30 वर्षीय शेतक-याने तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत पथकाच्या विभागाने सापळा रचून 18 हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगाहात पकडले.