Breaking News

जुडवा-2 100 कोटी पार

मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात  या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. मार्केट अ‍ॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर या सिनेमाबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं आतापर्यंत 102  कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा येत्या काही दिवसात आणखी कमाई करेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
100 कोटी कमावणारा हा या वर्षीचा सातवा सिनेमा आहे. याआधी ‘रईस’ (137.51 कोटी), काबिल (103.84 कोटी), जॉली एलएलबी 2 (117 कोटी),  बद्रीनाथ की दुल्हनिया (116.68 कोटी), बाहुबली (510 कोटी), ट्यूबलाइट (119.26 कोटी), टॉयलेट- एक प्रेम कथा (134 कोटी) या सिनेमांनी 100  कोटींहून अधिक कमाई केली आहे. जुडवा -2 हा सिनेमा सलमानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन आहे.