0
गुवाहाटी, दि. 11, ऑक्टोबर - गुवाहाटी ट्वेंटी ट्वेंटीत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा आठ विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं  119 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 15.3 षटकांत पूर्ण केले.
मॉइजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड हे कांगारूंच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी मिळून तिसर्‍या विकेटसाठी अभेद्य 109 धावांची भा गिदारी केली. हेनरिकेजनं आपल्या अर्धशतकी खेळीत 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबााद 62 धावा फटकावल्या. तर हेडनं 34  चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह धावांची खेळी केली. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंनी आता 1-1 अशी  बरोबरी साधली आहे.
तत्त्पूर्वी टीम इंडियाने 20 षटकांमध्ये सर्व विकेट्स गमावून 118 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेहरेनड्रॉफ, झम्पा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे  टीम इंडियातील मातब्बरांनी नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार कोहली भोपळाही न  फोडता तंबूत परतला. त्यानंतर मनिष पांडे, शिखर धवनही एकेरी आकड्यांवर बाद झाले.

Post a Comment

 
Top