Breaking News

तिसरा टी-20 सामना आज

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - गुवाहाटीतील या सामन्यानंतर उभय संघ हैदराबादच्या रणांगणात  तिसर्‍या आणि अंतिम ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आमनेसामने येतायत. यावेळी मात्र विराटचा संघ हा सामना जिंकून  मालिकाविजयासाठी आसुसलेला असेल.
मॉईजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड याच्या तडाखेबंद शतकी भागिदारीनं ऑस्ट्रेलियायाला दुसर्‍या ट्वेंटी ट्वेन्टी सामन्यात  8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून दिला. हा सामना  जिंकून ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
गुवाहाटीच्या सामन्यात आधी भारतीय फलंदाजांचं अपयश आणि त्यानंतर गोलंदाजांची खराब कामगिरी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली.  त्यात  जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक  गोलंदाजीसमोर भारताच्या  सुरुवातीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, मनीष पांडेसारखे खंदे शिलेदार केवळ 27 धावात तंबूत  परतल्यानं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  त्यानंतर गोलंदाजांच्या निष्प्रभ कामगिरीमुळे केवळ 119 धावांचं माफक लक्ष्य कंगारुनी 15 षटकं आणि तीन चेंडूतच  पार केल. तेही केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात. कांगारुंच्या या विजयानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे त्यामुळे हैदराबादची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीनं निर्णायक  ठरणार आहे.