Breaking News

कोपर्डी खटल्याची सुनावणी होणार 26 ऑक्टोबरला

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - कोपर्डी अत्याचार हत्या प्रकराणातील खटल्यातील अंतिम युक्तीवादाला आज सुरुवात होणार होती. एका आरोपीचे वकिल न्यायालयात हजर न  झाल्यामुळे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड.उज्वल निकम यांनी आज तारीख देण्यात आली असतांना वकिलांनी अगोदर कळविणे गरजेचे होते. मी पण कोल्हापुरहून येथे तारखेला आलो आहे.  ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या खटल्याची सुनावणी दि. 26 रोजी ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले यांनी दिले आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी  म्हणजे 28 व 29 रोजी नियमित खटला चालू राहील का? बाबतसुद्धा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. 
कोपर्डी खटल्याचा अंतिम युक्तीवादाला आज सुनावणी होणार होती. सकाळी न्यायालयामध्ये आरोपींना आणण्यात आले होते. एका आरोपीचे वकिल अ‍ॅड.बाळासाहेब खोपडे न्यायालयामध्ये  उपस्थित राहू शकले नाही. दुसरे वकिल अ‍ॅड. मकासरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. व ते येणार नसल्याचे सांगितले. त्याच दरम्यान खोपडे यांचा अंगरक्षक याने संबंधीत पोलिसांना सांगून  पुणे जवळील वाघोली येथे वाहतुक कोंडी असल्यामुळे आम्ही येवू शकत नाही, असा निरोपही दिला होता. या संदर्भात विशेष सरकारी वकिल निकम यांनी थोडावेळ थांबून त्यांनी येणे अपे क्षित होते. नगरकडे येण्यासाठी अन्यसुद्धा मार्ग आहेत. ही बाब निदर्शनास आणून देऊन हा प्रकार खेदाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता सौजन्यातून त्यांनी आम्हाला कळ विले असते तर न्यायालयाचाही वेळ वाचला असता. वकिल हा न्यायालयाचा अधिकारी असतो. न्यायालयाला मदत करणे महत्वाचे कार्य आहे. अ‍ॅड.खोपडे यांच्यामुळे युक्तीवादास सुरुवात  करता आली नाही. मी कोल्हापुर येथून सांगली येथे आलो व तेथून आज पहाटे 3.30 वा येथे दाखल झालो व आज खटल्यास हजर ही राहिलो ही बाब निकम यांनी न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिली. आजच्या सुनावणीच्यावेळी आरोपीचे दुसरे वकिल योहान मकासरे व अ‍ॅड. प्रकाश आहेर हे उपस्थित होते. न्यायालयाने आज दोन्ही बाजूचा विषय ऐकल्यानंतर  पुढील सुनावणी दि. 26 नोव्हेंबररोजी नियमितपणे ठेवण्याचे आदेश दिले असून, सुट्टीच्या दिवशीसुद्धा म्हणजे दि. 28 व 29 रोजी सुनावणी घेता येईल का? याबाबत सुद्धा विचार केला  जाईल, असे सांगितले.