Breaking News

दसर्‍याच्या मुहूर्तावर आरटीओला एका दिवसात 3 कोटींचा महसूल

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दसरा सणाच्या मुहूर्तावर तब्बल 1 हजार 205 वाहनांची नागरिकांनी खरेदी केल्याची नोंद  करण्यात आली आहे. वाहन खरेदीतून आरटीओ कार्यालयास 3 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
सणाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य देणार्‍या नागरिकांनी 769 दुचाकी खरेदी केल्या आहेत. 223 चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. तसेच 213  व्यावसायिक वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या दसरा सणाच्या खरेदीच्या तुलनेच्या महसूलात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच दर दिवशीच्या  खरेदी तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ आठवड्यात झाली असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे.
राज्यातील सर्वाधिक वाहन संख्या असलेल्या पुणे शहरात नव्याने 1205 वाहनांची भर रस्त्यावर पडली आहे. सार्वजनीक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी  वाहन खरेदीला प्राधान्य देणार्‍या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरात वाहन खरेदीचा आलेख वेगाने वाढत आहे. परिणामी प्रदूषण,  वाहतूककोंडी, पार्किंग समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.