Breaking News

पालकमंत्री गिरीष महाजन यांचा 30 ऑक्टोबर रोजी जनता दरबार

नाशिक, दि. 11, ऑक्टोबर - जिल्ह्याच्या विविध विभागात प्रलंबित असलेल्या अथवा जनतेची मागणी असलेल्या विषयांच्या संदर्भात  पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन  येथे ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येणार असून त्याद्वारे जनतेच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत .
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि दुसर्‍या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांच्या  समस्यांचा निपटारा लोकशाही दिनाच्या माध्यमातून करण्यात येतो. तथापि मंत्री महोदय जिल्हा दौर्‍यावर असतांना किंवा मंत्रालयात भेटून  नागरिक त्यांना आपल्या समस्येविषयी निवेदन देतात. नागरिकांचे असे प्रश्‍न जनता दरबारात समक्ष अधिकार्‍यांशी चर्चा करून सोड विण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जनता दरबारासाठी जिल्हा आणि विभागस्तरीय अधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याच्या सुचना पालक मंत्री महाजन यांनी दिल्या आहेत.
तक्रारदाराची समस्या तात्काळ सोडविण्यासारखी नसल्यास त्यासाठी पालकमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम आदेशित केला जाईल. तह सिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात तसेच दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या  न्यायालयीन प्रकरणांबाबत जनता दरबारात तक्रारी दाखल करता येणार नाही.
नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर प्रलंबित कामाबाबत किंवा कामकाजाबाबत काही तक्रारी असल्यास तक्रारीचे स्वरुप, संबंधित विभाग, संबं धित अधिकारी आदी उल्लेखासह 30 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथे उपस्थित राहावे. ग्रामीण भागातील नागरिकांनी सकाळी 9 ते  10.30 आणि शहरी भागातील नागरिकांनी दुपारी 1 ते 2.30 यावेळेत तक्रार नोंदणी करावी. पात्र तक्रारींना टोकन क्रमांक देण्यात येऊन  ग्रामीण भागातील तक्रारींचे निराकरण दुपारी 1 ते 2.30 आणि शहरी भागातील तक्रारींचे निराकरण दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30  वाजेपर्यंत करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या जनता दरबाराचा लाभ घ्यावा. असे आवाहन  प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.