Breaking News

‘त्या’ 35 फूटी झाडूची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - मीरा-भाईंदर झोपडपट्टीतील काही महिलांनी ‘विल इंडिया चेंज’ फाऊंडेशनच्या मदतीने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने  35 फूट झाडू तयार केला. आज ‘मॅक्सेस मॉल’मध्ये महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते या भल्या-मोठ्या झाडूची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचे  जाहीर करण्यात आले. हा झाडू बनविण्यासाठी झाडूच्या एका प्रतिष्ठित कंपनीने सहकार्य केले. सुहासिनी साकीर यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त 1 तास 15 मिनिटांत हा  झाडू बनवण्यात आला. हा झाडू बनविण्यामागे पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सहकार्य करण्याचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.