Breaking News

तलासरीतील दापचरी दुग्ध प्रकल्पात 40 कोटींच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त

पालघर, दि. 05, ऑक्टोबर - पालघर जिल्ह्यातील तलासरी भागात असलेल्या दापचरी दुग्ध प्रकल्पातून 40 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात  आला. गुन्हे अन्वेषण विभाग व तलासरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही बाब उघड झाली. या प्रकरणी 3 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या कारवाईत दुग्ध प्रकल्पाला लागून असलेल्या घरामागे असलेल्या गोठ्यात अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, केमिकल, मशीन, पावडर आदी जप्त  करण्यात आले. नालासोपारामध्ये अटक केलेल्या एका आरोपीने दिलेल्या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला.