0
पुणे, दि. 09, ऑक्टोबर - वडगाव शेरी येथील एका बारच्या काऊंटरमधून 44 हजार 800 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरण्यात आली. याप्रकरणी चंदननगर  पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. माधव मोरे (22,रा.लोहीयानरग, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमर विजय कुटे(40,रा.खराडी) व निरज राजीव  देठे (30,रा.वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली आहे. 
फिर्यादी हे वडगावशेरीतील गणेशनगर येथील प्यॉपुलर कंट्री लिकर बार या देशी दारुच्या
दुकानात काम करतात. आरोपींनी त्यांना व त्यांचा सहकारी योगेश अगरवाल  यांना हाताने ढकलून दुकानाच्या गल्ल्यातील रोख 44 हजार 800 रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. यासंदर्भात चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात  आली होती. यावेळी पोलिसांना त्यांच्या खबर्‍यामार्फत आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार, आरोपींना पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नामदे  तपास करत आहेत. 

Post a Comment

 
Top