0
मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - मुंबई महापालिकेच्या भांडुप (प.) येथील वॉर्ड क्र. 116 मध्ये आज झालेल्या पोटनिवडणुकीत 50.64 टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या  नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे आ. अशोक पाटील यांच्या पत्नी व माजी नगरसेविका मिनाक्षी पाटील, भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांच्यासह सात उमेदवार रिंगणार होते. मात्र खरी  लढाई शिवसेना व भाजपच्या उमेदवारात असल्याचे सांगितले जात होते. या निवडणुकीसाठी 29 मतदान केंद्रांवर मिळून 38 हजार 105 मतदार होते. आज महिला मतदारांकडून चांगला  प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

 
Top