0
पुणे, दि. 08, ऑक्टोबर - बिबेवाडीतील बंद फ्लॅट फोडून 50 तोळे सोने लंपास केले आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी उघडकीस आली.या प्रकरणी  घरमालक धनवडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
धनवडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे धनवडे हे रात्री घराला कुलूप लावून  गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील रोकड आणि 50 तोळे सोने चोरले. सकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बिबवेवाडी  पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

 
Top