Breaking News

519 किलो प्लास्टिक कॅरिबॅग जप्त

सोलापूर, दि. 06, ऑक्टोबर - मनाई असलेल्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापराविरुद्ध महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. छापा टाकून तीन  व्यापार्‍यांकडे 519 किलो कॅरिबॅग जप्त केल्या. एकूण 1.31 लाखांचा ऐवज महापालिकेने जप्त केला. प्लास्टिक विक्री करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे  आवश्यक आहे. तपासण्यासाठी एस. के. आराध्ये, नागरी विचार मंचचे डॉ. राजा ढेपे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे के. डी. गोरे, भुई, मनपा अन्न परवाना निरीक्षक एम.  डी. शेरखाने यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तपासणी केली. त्यात 519 किलो कॅरिबॅग त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत 36 हजार रुपये इतकी होते. यासह इतर  सुमारे 1.31 लाखाचा ऐवज जप्त केला. यात संतोष सारडा यांच्याकडून 291 किलो तर राकेश वाधवानी यांच्याकडून 117, भिकचंद राठी यांच्याकडून 111 किलो  कॅरिबॅग जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिका अन्य परवाना विभागाकडून देण्यात आली.