Breaking News

शरद पवार यांच्या उपस्थितीत 6, 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत 6 व 7 नोव्हेंबर रोजी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार,  खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास 300 महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. देशभरात सध्या असलेले वातावरण  व राज्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांच्या उपस्थितीत 15 ऑक्टोबर, रविवारी, सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलची बैठक आयोजित केली आहे. राज्यभरातून अनेक डॉक्टर  या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.