Breaking News

‘राजहंस’च्यावतीने आता 6 लिटरची दूध पिशवी

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - तालूका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांचे हस्ते नवीन पॅकिंगमध्ये 6 लिटर दूध पिशवीचे अनावरण करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून बाजारपेठेच्या मागणीनुसार राजहंसने 6 लिटर दुधाची पिशवी सुरु केली आहे. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष व संगमनेर दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाजीराव खेमनर, संचालक आर. बी. राहाणे, लक्ष्मणराव कुटे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, पांडुरंग सागर, विलासराव कवडे, बाबासाहेब गायकर, गंगाधर चव्हाण, विलासराव वर्पे, जि. प. समिती सभापती अजय फटांगरे, सुभाष आहेर, जि. प. सदस्य आर. एम.  कातोरे,  कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, गणपतराव शिंदे आदी मान्यवरांसह दूध संघाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी राजहंस चीज, पनीर, तूप, सुगंधी दूध या उपपदार्थांच्या नव्या आकर्षक पॅकिंगचेही अनावरण करण्यात आले.