Breaking News

70 व्या औंध संगीत महोत्सवाला प्रारंभ

सातारा, दि. 11, ऑक्टोबर - औंधच्या पवित्र श्रीमूळपीठ देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी  असलेल्या श्री दत्त मंदिरासमोरील औंध कला मंदिरात माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 70 व्या औंध संगीत  महोत्सवास मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, खटाव पंचायत समिती सभापती संदिप मांडवे,पं. अरूण कशाळकर, सरपंच नंदिनी  इंगळे, सुनील पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले औंध संगीत महोत्सवास मागील शहात्तर वर्षांची परंपरा आहे. ग्रामीण भागातील हा एकमेव शास्त्रीय  संगीत महोत्सव असल्याने या संगीत महोत्सवाची ख्याती ,महत्त्व देशासह जगाच्या कानाकोपर्याणत पोहचावे यासाठी आपण सर्व ती मदत  करणार आहोत. मागील तीन पिढयांपासून हा सांगितीक वारसा जोपासला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पहिल्या सत्राची सुरुवात पं.सौम्या यांच्या गायनाने झाली. त्यानंतर चिराग कट्टी यांचे संतूरवादनाने तसेच पं.शौनक अभिषेकी  यांनी गायलेल्या राग शुद्धसारंग व देवगंधार ने उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.