Breaking News

नाशिक रँडोनर्स मायलर्सचे 8 ऑक्टोबरला पदक वितरण

नाशिक, दि. 08, ऑक्टोबर - नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचा महत्वाकउपक्रम असलेल्या नाशिक रँडोनर्स मायलर्स म्हणजेच एनआरएम सायकलिंगचे 8  ऑक्टोबर रोजी पदक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 80 आणि 120 किमीच्या वेळेचे बंधन  असलेल्या राईड्स केल्या जातात. येत्या 8 ऑक्टोबरला ’एनआरएम’ची दहावी राईड करण्यात येणार असून त्यानंतर हा सोहळा रोटरी हॉल, गंजमाळ येथे दुपारी 2  ते 5 यावेळेत पार पडेल.
पदक वितरणासाठी सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती उपस्थित राहणार असून पहिल्या भारतीय महिला सुपर रँडोनर दिव्या ताटे (पुणे), रेस  अराऊंड ऑस्ट्रिया पूर्ण करणारे पाहिले भारतीय भारत पंन्नू, रेस अक्रोस अमेरिका सोलो गटात पूर्ण करणारे डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, टीम ऑफ टू गटात रॅम पूर्ण  करणारे डॉ. महेंद्र महाजन, सायकलिंग प्रशिक्षक मितेन ठक्कर, टीम ऑफ फोर मध्ये रॅम पूर्ण करणारे डॉ. राजेंद्र नेहेते, आर. डी. पाटील, आयर्नमॅन सुमेध वाव्हळ,  नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांच्या हस्ते पदक वितरण होणार आहे.
एनआरएम मध्ये खेळाडूंनी सातत्य राखावे यासाठी सलग तीन राईड मध्ये सहभागी होणार्‍या सायकलीस्टला सिल्वर मेडल, सलग सहा राईड्ससाठी गोल्ड, सलग नऊ  राईड्ससाठी डायमंड तर सलग बारा राइड्स मध्ये सहभागी होणार्‍या सायकलीस्टला प्लॅटिनम मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
एनआरएमच्या पहिल्या आवृत्ती मधील 12 पैकी 10 राईड्स पूर्ण झाल्या आहेत. यात दोन सायकलिस्ट्सने सलग नऊ राईड्स पूर्ण करत डायमंड मेडल मिळवले  असून 8 सायकलिस्ट्सने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. एकूण 44 सायकलिस्ट्सने सिल्वर मेडल मिळवले आहे.
एनआरएमच्या सातव्या राईडचे वेळी नाशिक सायकलिस्ट्सचे तत्कालीन अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांचा हृदयरोगाचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्यांच्या  स्मृतींना उजाळा देण्यासाठी ट्रिब्युट राईडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होणार्‍या सर्व 130 रायडर्सला ट्रिब्युट मेडल देण्यात येणार आहे. या  सोहळ्याचे संपूर्ण नियोजन एनआरएम टीमचे धीरज छाजेड, गणेश पाटील, विकाश जैन यांनी केले आहे.