Breaking News

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाकडून 80 कोटींची तरतूद

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 80 कोटी रुपयांचा राज्य शासनाचा वाटा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आला आहे. नगरविकास विभागाने आज या  बाबतचा आदेश काढला. शासनाने या आधी 10 कोटी रुपये दिले होते. या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण हिस्सा 1 हजार 310 कोटींचा असेल.