Breaking News

भुसावळच्या अमृत योजनेची जैन इरिगेशनला 84.50 कोटींची ऑर्डर

जळगाव, दि, 12, ऑक्टोबर - भुसावळ येथील 84.50 कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प उभारण्याची वर्कऑर्डर जैन इरिगेशन सिस्टिम्सला मिळाली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत  या वर्कऑर्डरसाठी निधी दिला जाणार आहे. येत्या 24 महिन्यात हा प्रकल्प पुर्ण करायचा असल्याचे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी सांगितले.
केंद्र सरकारने पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा उद्देश ठेवत अमृत योजनेला सुरवात केली आहे त्या अंतर्गत भुसावळ येथील पाणी पुरवठा प्रकल्प उभारण्याची वर्कऑर्डर जैन इरिगेशन  सिस्टिम्सला राष्ट्रीय स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात स्त्रोतापासुन ग्राहकाच्या घरापर्यंत पाणी पोचवले जाणार आहे. यासाठी पाण्याच्या स्त्रोताजवळ पंपिंग हाऊस,  जलशुद्धीकरण संयंत्र, 220 किलोमीटर लांब पाईपलाइन उभारावी लागेल. इतरक कामात साध्या पाण्याच्या वाहतुकीसाठी पाईपलाइन शुद्ध पाण्याची मुख्य पाईपलाइन आणि वितरण  व्यवस्था, 11 आरसीसीचे जलकुंभ उभारणे नियोजीत आहे. या प्रकल्पामुळे भुसावळ शहराच्या नागरिकांना पुढील 30 वर्षांपर्यंत तापी नदीतून शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. हा प्रकल्प जैन इ रिगेशनला 24 महिन्यात पुर्ण करायचा आहे. सध्या जैन इरिगेशन भारतात आणि विदेशातील 24 तास पाणी पुरवठा प्रकल्पांच्यासह इतर पाणी पुरवठा करणार्‍या अनेक प्रकल्पांची  अंमलबजावणी करत आहे. जैन इरिगेशन ही सुक्ष्म सिंचन प्रणाली, पाईपने सिंचन करण्याचे प्रकल्प, ठिबक सिंचन, सौर उर्जा प्रकल्प आदी क्षेत्रात कार्यरत आहे.
कंपनीने पाण्याच्या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्याचा नवीन पल्ला गाठला आहे. आम्ही भारतातील अशा अनेक संधीचे स्वागत करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पाणी शुद्धीकरण  संयंत्र आणि वितरण जाळे उभारणे यासाठी कार्य करू.