Breaking News

सरपंचपदासाठी 90 तर सदस्य पदासाठी 504 अर्ज पात्र

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायत निवडणूक छाननी प्रक्रियेअंती सरपंचपदासाठी 90  तर सदस्य पदासाठी 504 अर्ज पात्र ठरले आहेत. सरपंच पदासाठी छाननीनंतर 4 अर्ज व सदस्य पदासाठी छाननीनंतर 11 अर्ज अपात्र ठरले असल्याचे  तहसीलदार हनुमंत पाटील यांनी कळविले आहे.
सरपंचपदासाठी अवैद्य ठरलेल्या अर्जांची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे - लोणीभापकर- 0, कार्‍हाटी - 0, सोनकसवाडी - 0, वाणेवाडी - 0, कुरणेवाडी - 0,  मासाळवाडी - 0, मुरुम - 1, मोरगाव - 0, पळशी - 0, गडदरवाडी - 0, पणदरे - 3, सोरटेवाडी - 0, वाघळवाडी - 0 अशी एकूण 04 अर्ज छाननीनंतर  अवैद्य ठरले आहेत.
सदस्य पदासाठी अवैद्य ठरलेल्या अर्जांची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे - लोणीभापकर- 1, कार्‍हाटी - 0, सोनकसवाडी - 2, वाणेवाडी - 0, कुरणेवाडी - 1,  मासाळवाडी - 1, मुरुम - 0, मोरगाव - 0, पळशी - 0, गडदरवाडी - 0, पणदरे - 5, सोरटेवाडी - 1, वाघळवाडी - 0 असे एकूण 11 अर्ज छाननीनंतर  अवैद्य ठरले आहेत.