Breaking News

औरंगाबाद जिल्ह्यात 95 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

औरंगाबाद, १० ऑक्टोबर - औरंगाबाद जिल्ह्यातील 213 ग्रामपंचायतींसाठी जाहीर झालेल्या 95 पैकी 57 ग्रामपंचायतीवर भाजपचा झ्रेंडा फडकला आहे..7 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली. यासाठी 16 टेबल लावण्यात आले होते. निवडणुकीचे निकाल जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी उसळली होती. पैठण तालुक्यात 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदर ग्रामपंचायतीवर शिवसेना-काँग्रेस युतीच्या वैद्य तर कुरण पिंप्री येथे अस्मा रफीक पटेल या विजयी झाल्या. नांदर येथे तिरंगी लढत होती. त्यात काँग्रेस-शिवसेना संयुक्‍त शेतकरी विकास पॅनलच्या मीना किशोर वैद्य या सरपंच म्हणून निवडून आल्या. कुरण पिंप्री येथे परिवर्तन पॅलनच्या अस्मा रफीक पटेल या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. मुधलवाडी येथे काका बर्वे, धनगाव येथे बापूसाहेब कातबणे, टाकळी पैठण येथे महेश सोलाट तर साल वडगाव येथे चंद्रकला दळवे निवडून आले आहेत. नारायण गाव येथे संजय गवळी, बोरगाव येथे दत्ता रंगदर, दोन दिवस वाहतूकदारांचा चक्काजाम धार्मिक स्थळांबाबत उद्या समितीची बैठक उधळला गुलाल शेकटा येथे विष्णू भवर सरपंचपदी विजयी झाले आहेत. निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव म्हणाले की, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 95 निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपला 57 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. मतदारांनी सर्व स्तरावर भाजपवर विश्‍वास दाखविला आहे असे एकनाथ जाधव म्हणाले.
हिंदुस्थान समाचार