Breaking News

प्रा.एन.डी.पाटील विद्यालयाची वैशाली हिवरकर राज्यस्तरावर

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - शासन शालेय शिक्षण व क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा अंतर्गत विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा दि.5 ऑक्टोबर रोजी क्रीडा संकुल बुलडाणा येथे  पार पडल्या. त्यामध्ये प्रा.एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय, हिवरा खुर्द विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैशाली विनोद हिवरकर वर्ग 9 वा हिने 400 मिटर, 800 मीटर धावण्याच्या  स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक पटाकावून नागपूर येथे 24 ते 26 ऑक्टोबर 2017 दरम्यान होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
सलग दुसर्‍या वर्षी वैशाली राज्यस्तरावर खेळणार असल्यामुळे परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिला क्रीडा शिक्षक गोवर्धन राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे  मुख्याध्यापक सुरेश मुठे यांनी तिचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दत्ताजी भुतेकर, सचिव रेखाताई भुतेकर यांनी वैशालीला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा  दिल्या आहेत. यावेळी विद्यालयातील शिक्षक ठाकरे, गावंडे, शिंगणे, शेळके, अनंता शिंदे, रवि शेळके, दाभाडे, शिंदे मॅडम आदींची उपस्थिती होती.